अमळनेर - राज्याच्या आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते आ.अजित पवार व शिवसेनेचे नेते आ.गुलाबराव पाटील यांनी अनुक्रमे उपमुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्याबद्दल अमळनेरचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर येथे विश्रामगृहा
समोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात केला.
राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने अमळनेर तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त होईल व धरणाचा प्रश्न मार्गी लागेल
- मा.आ. साहेबराव पाटील
आनंदोत्सव साजरा करतांना व फटाके फोडताना दलित नेते रामभाऊ संदानशिव, नगरसेवक विनोद लांबोळे,शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप शिंपी,
संजय मराठे,नरेंद्र संदानशिव, मनोज पाटील, विक्रांत पाटील ,श्याम यादव ,सुरेश पाटील, संतोष पाटील, प्राध्यापक रामकृष्ण पाटील,विवेक पाटील,आरिफ पठाण, राहुल गोत्राळ, सुभाष भोई, पांडुरंग भोई, अॅड. किरण पाटील ,विजय पाटील,रऊफ शेख, रवींद्र पाटील ,कांतीलाल वाणी शरीफ शेख, जीवन पवार ,शेख मुक्तार, संजय पाटील, शेखा मिस्तरी,माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments
Post a Comment