अमळनेर - प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत कौशल भारत कुशल भारत या ब्रीद वाक्यासह कार्यरत असलेल्या कौशल विकास और उद्यमिता मंत्रालय भारत सरकार कडून जागतिक छायाचित्रकार दिना निमित्त राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क या प्रमाणपत्र कोर्स मधील लेव्हल ४ मध्ये अमळनेर येथील प्रसिद्ध छायाचित्रकार पठाण नूरखान मुक्तार खान यांना या 'ए' ग्रेडने प्रमाणित करण्यात आले आहे.
सदर प्रमाणपत्र नूरखान यांनी सहाय्यक कॅमेरामॅनच्या मूल्यमापन परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल देण्यात आले आहे.भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कौशल्य क्षेत्रातील पात्रता परीक्षांमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणित करण्यात येते.सदर प्रमाणपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार होते. परंतु सध्या कोव्हीड १९ च्या आपत्ती व्यवस्थापन काळात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) ही एक कार्यक्षमता-आधारित फ्रेमवर्क आहे जी ज्ञान, कौशल्ये आणि योग्यतेच्या स्तरांच्या मालिकेनुसार सर्व पात्रतांचे आयोजन करते. या अंतर्गत विविध कौशल्य विकास क्षेत्रातील तज्ञ,कुशल कलाकार,
विविध कुशल आणि अकुशल युवकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) ही युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे. या योजनेअंतर्गत, अभ्यासक्रमात सुधारणा, योग्य शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षकांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवहार कुशलता व व्यवहार परिवर्तन याचा देखील समावेश आहे.हे प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.याच उपक्रमा अंतर्गत अमळनेर येथील पत्रकार आणि छायाचित्रकार पठाण नूरखान यांनी प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केल्याने त्यांना भारत सरकारकडून 'ए' ग्रेड देऊन गौरविण्यात आले आहे. या त्यांच्या यशामुळे त्यांचे शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक,व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.तसेच कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
No comments
Post a Comment