अमळनेर - पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे असलेल्या बोरी मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी २६६.८५ मीटर इतकी वाढलेली आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून आज रात्री ५ दरवाजे उघडून २२५५ क्यूसेक्स एवढा विसर्ग बोरी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे बोरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment