अमळनेर - पैलाड भागातील प्रसिद्ध फोटोग्राफर श्री सोमनाथ ढोमन पाटील यांचे वयाच्या ७९ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले ,२ मुली , सुना, नातु- नातवंडे जावई असा परिवार आहे.
ते पटेल फोटोचे संचालक भगवान पाटील व विश्वास पाटील यांचे वडील होते .तर पंकज व ललित यांचे आजोबा होते.
छायाचित्रकार क्षेत्रातील कामाने समाज आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ छायाचित्रकार श्री सोमनाथ ढोमन पाटील यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे,
अमळनेर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध फोटोग्राफर श्री सोमनाथ ढोमन पाटील यांना आदराचे स्थान होते.
काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या दूरदर्शी स्व. सोमनाथ ढोमन पाटील यांना अमळनेर हेडलाइन्सची विनम्र श्रद्धांजली.
No comments
Post a Comment