अमळनेर तालुक्यात पुढील तीन दिवस जनता संचारबंदी नागरिकांनी गांभीर्याने नियम पाळण्याचे आवाहन

-------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट तर होणार नाही ना अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यातच ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.संपुर्ण जिल्ह्यात अमळनेर तालुका आघाडीवर आहे. यावर उपाय म्हणून येथील प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी दि.२४ ते २६ एप्रिल या कालावधीत पुढील ३ दिवस जनता संचारबंदी घोषित केली आहे. पुढील ३ दिवस शहरातील सर्व दुकाने व भाजीपाला वगैरे सर्व व्यवहार बंद रहाणार आहेत. जनतेने या संचारबंदीला पाठींबा देऊन सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 
कारण काही दिवसांपूर्वी मुंगसे प्रकरणाच्या वेळी देखील अश्याच प्रकारची संचारबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र तेव्हाजनतेने कायदा व नियमगांभीर्याने पाळले नव्हते. आता तालुक्यात कोरोनाच्या घटना पहाता आता तरी जनता या संचारबंदीचे पालन करणार की नाही असाही प्रश्न समाजात उपस्थित होत आहे. 
         प्रशासन या काळात कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ही संचारबंदी संपूर्ण  तालुक्यात १००% राबविण्यात येणार आहे. जनतेने अत्यंत महत्वाच्या व आवश्यक कामाशिवाय बाहेर निघू नये. शासकीय कर्मचा-यांनी देखील तालुक्याच्या बाहेर जाऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात अन्य गावातून अथवा जिल्ह्याबाहेरून कोणालाही येण्यास निर्बंध आहेत. असे नागरिक आल्यास प्रशासनास त्वरित संपर्क साधावा असे सुचित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही सांगण्यात आले आहे. शहरातही संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक,व्यापारी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. 
तरी या संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.
---------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.