-----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
जळगाव – अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तीपैकी तीन व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.दि. २० ते २२ एप्रिल या कालावधीत कोविड-१९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी ८ व्यक्तींच्या स्वॅबचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अमळनेरातील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.



