आ.स्मिताताई वाघ आज फेसबुक लाईव्हमध्ये साधणार संवाद

अमळनेर -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अमळनेर या फेसबुक पेजवरून सुरू करण्यात आलेल्या "ज्ञानशृंखला" या मालिकेत आज दि.१९ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता आमदार स्मिताताई वाघ या " संकट काळातही न थांबणारा बळीराजा " या विषयावर संवाद साधणार आहेत. रा.स्व.संघातर्फे  लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. यात विविध विषयांवर मान्यवरांचे विचार घरबसल्या आपणास ऐकता येणार आहेत.
  दि.१७ एप्रिल रोजी या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. यास दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज सकाळी ११ वाजता व सायंकाळी  ६ वाजता अशा दोन सत्रात वेगवेगळ्या वक्त्यांचे विचारांचा लाभ घेता येणार आहे. दर्शकांनी आपल्या फेसबुक पेजवरून RSS Amalner  यावर लाईक/शेअर/फॉलो करून या फेसबुक पेजला कनेक्ट होऊन या संवादात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.