मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन

Tuesday, October 22, 2024

/ by Amalner Headlines
महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज


*अमळनेर* :- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आज सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे.सदर प्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी कडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित राहण्याची शक्यता असून याव्यतिरिक्त जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ व जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
असा असेल रॅलीचा मार्ग
      सदर महारॅली श्री मंगळ ग्रह मंदीर येथून प्रारंभ होईल. तेथून पैलाड चौफुली,दगडी दरवाजा,तिरंगा चौक,बस स्टँड,महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे.
रॅलीची जोरदार तयारी
              मंत्री अनिल पाटील व महायुती तर्फे या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण मतदारसंघात होम टू होम निमंत्रण देण्यात आले आहे.प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती अशी ही महारॅली निघेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
महायुतीतर्फे आवाहन
         अनिल पाटील यांची उमेदवारी म्हणजे मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारी आणि मतदारसंघाची अस्मिता जागविणारी असल्याने यावेळी महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप,शिवसेना,रीपाई (आठवले गट) चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील समस्त नागरिक व हितचिंतकांनी  मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी  महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines