*अमळनेर* - यंदाच्या निवडणुकीत अमळनेर येथे महायुतीचा मेळावा झाला असता त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल पाटील यांना जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढे चांगले खाते मिळू शकते असे भाकीत केले होते, अमळनेरच्या जनतेने आता त्यांना ३३ हजारांचे मोठे मताधिक्य दिल्याने,मंत्री महाजन यांच्या वक्तव्याची आठवण अमळनेरकराना असून महायुती सरकार आता त्यांना कोणते खाते देणार?अशी चर्चा होत आहे.दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव आमदार असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

