*अमळनेर* : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता. अमळनेर विधानसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल.
काल अखेर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांमध्ये विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील व माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),खा.शि.मंडळाचे संचालक डॉ.अनिल नथ्थु शिंदे (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस),सचिन अशोक बाविस्कर,रा.चोपडा (बहुजन समाज पार्टी),प्रदीप किरण पाटील(महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) यांच्यासह माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी,अनिल भाईदास पाटील(रणाईचे),माजी जि.प.सदस्य शिवाजी दौलत पाटील(लोण),प्रा.अशोक पवार,धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास दयाराम पाटील(अमळनेर),प्रतिभा रविंद्र पाटील,निंबा धुडकू पाटील(वाघोदे),अमोल रमेश पाटील(अमळगाव), प्रथमेश शिरीष चौधरी(अमळनेर),संगीता प्रमोद पाटील(कळमसरे),रतन भानु भिल(भोलाणे ता.पारोळा),छबिलाल लालचंद भिल(कोळपिंप्री ता.पारोळा) या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज सकाळी ११ वाजता या अर्जांची छाननी करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निंर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.
-------------------------------

