मोटरसायकलला कट - मारहाणीत तरूणाचा मृत्यू

एलसीबीने तीन संशयितांना घेतले ताब्यात

*अमळनेर* -  तालुक्यातील  अमळगाव जवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या तरूणाच्या खून प्रकरणातील तीन संशयितांना पोलीसांनी अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून जेरबंद केले आहे. एलसीबीने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       तालुक्यातील पिंगळवाडे येथे आपल्या मित्रांसह तमाशा पहाण्यासाठी गेलेला विकास प्रविण पाटील,वय ३०
(रा.अमलेश्वर नगर,अमळनेर) याचा अमळगाव जवळ मोटरसायकलचा कट लागल्यावरून वाद झाला.  यावेळी झालेल्या हाणामारीत विकास याचा मृत्यू झाला. ही घटना अंदाजे पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. विकास याचे शव अमळनेर ग्रामीण रूग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले.
        या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलीस यंत्रणेने तातडीने तपास सुरू केला. घटनेच्या अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून संशयित आरोपी नितीन पवार,अमोल कोळी,हर्षल गुरव यांना पोलीसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.