यश बँकेच्या बीएनए मशीनमध्ये बनावट २०० रुपयांच्या नोटचा भरणा अमळनेर शहरात बनावट नोट चालवण्याचे रॅकेट असण्याची शक्यता, अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर -
येथील यश बँकेच्या बीएनए मशीन मध्ये रंगीत झेरॉक्स काढलेली बनावट २०० रुपयांची नोट भरून फसवणूक केल्याची घटना दि.२१ डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी बुधवारी अनोळखी व्यक्तींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अमळनेर शहरात बनावट नोटा व्यवहारात     चालवण्याचे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यश बँकेत २१ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून इमेल आला की अमळनेर शाखेत बीएनए मशीन मध्ये २०० रुपयांची बनावट नोट आली आहे. त्यांनतर मशीन हाताळणाऱ्या पथकाला ती नोट( ४ ए एन ३८४२१५)  आढळून  आली. ही नोट रंगीत झेरॉक्स काढलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही नोट बीएनए मशीन मध्ये २१ रोजी दुपारी १२ वाजून २२ मिनीटानी टाकण्यात आली आहे. बँकेच्या नियमानुसार महिना संपल्यानंतर व्यवस्थापक दादासाहेब भागीनाथ होळकर यांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादंवि ४८९ क प्रमाणे गुन्हा नोंदविला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय वना पाटील करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.