येथे झाली चोरी
अमळनेर शहरातील आठवडे बाजार परिसरात असलेल्या कोंबडी बाजार,खड्डा जीन भागातील काही दुकाने चोरट्यांनी आपले लक्ष केल्याची घटना गुरूवारी सकाळी लक्षात आली. या भागातील मयूर मोबाईल,सना इलेक्ट्रॉनिक,गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक,पी.जी.टेलर्स,दुर्गा टी डेपो,गरीब नवाज मोबाईल,सुविधा इलेक्ट्रीकल या दुकानांमध्ये चोरी झाली असल्याचे दिसून आले. काही दुकानांचे शटर वाकवलेले तर काही दुकानांच्या छतावरील पत्रा कापल्याचे दिसून आले. रहदारीच्या रस्त्यावरील दुकानात चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. यातील दुर्गा टी डेपो या दुकानात आतापर्यंत ७ वेळा चोरी झाली असल्याची चर्चा आहे.
छोटे दुकानदारांवर संकट
या घटनेत कुणाचे किती नुकसान झाले आहे याबाबत माहिती मिळाली नाही. पण या भागात छोटे दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. अशा दुर्घटनेमुळे या दुकानदारांवर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.एकाच परिसरात ७ ठिकाणी चोरी होणे म्हणजे चोरांची हिंमत वाढली असल्याचे लक्षण आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेवून व कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यापारी बांधवांतून करण्यात येत आहे.


