अमळनेर नपाचे विषय समिती सभापती बिनविरोध

अमळनेर -  येथील नगर परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड काल दिनांक १९ रोजी बिनविरोध करण्यात आली.
यांची झाली निवड

       माजी आमदार शिरीष चौधरी,हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेकडून बांधकाम सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक साहेबराव वसंत पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील,आरोग्य सभापती कुमार रामकृष्ण बापूराव  पाटील, शिक्षण सभापती शेख नावेद अहमद मुशीरोद्दीन, महिला व बालकल्याण सभापती सौ.स्वाती सुरजसिंग परदेशी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम (पाटील).तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून शिवसेना गटाकडून श्रीराम भगवान चौधरी अपक्ष गटाकडून महेश प्रभाकर देशमुख,शहर विकास आघाडीचे भरतकुमार सुरेश लालवानी आदींची निवड उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी श्री मयूर भंगाळे यांनी घोषित केली. त्यांना मुख्याधिकारी श्री शिंदे यांनी सहाय्य केले.
यांची होती उपस्थिती
         या प्रसंगी शिवसेना गटाचे गटनेते पंकज चौधरी, मोहन सातपुते,सौ.कल्पना परदेशी,सौ सविता संदानशीव, दीपक चौगुले, सौ.अपूर्वा जालंधर चौधरी सौ.पाटील छाया बाळू, सौ.पुष्पा पंकज भोई,सुयोग ज्ञानेश्वर धनगर,अनिल गंगाराम महाजन, सौ.सुवर्णा तुळशीराम हटकर, प्रताप अण्णा साळी,  सौ.नीलिमा विश्वनाथ पाटील, सौ.तडवी इर्शाद सुनील ,सौ.भोई रूपाली पांडुरंग,शहर विकास आघाडीचे नगरसेवक डिगंबर महाले,सचिन कासार, प्रवीण पाटील,सौ शोभाबाई गढरे आदींची उपस्थिती  होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.