अमळनेर - येथील सुप्रसिद्ध खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
१२ पदांसाठी निवडणूक
खान्देशसह संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या नामांकित अशा खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दि.४ जानेवारी २०२६ रोजी मतदान संपन्न होणार आहे. मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.संस्थेच्या अध्यक्ष(१पद),उपाध्यक्ष (२पदे),विश्वस्त(१पद),संचालक (८पदे) या १२ पदांसाठी निवडणूक होत आहे.आजपावेतो एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
यांनी दाखल केली उमेदवारी
आज अध्यक्ष पदासाठी विजय जगन्नाथ बोरसे,लालचंद हेमनदास सैनानी,राकेश गिरीधरलाल माहेश्वरी व संतोष बाबुराव पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी सुभाष यशवंतराव पाटील,पुरुषोत्तम वसंत शेटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. विश्वस्त पदाच्या एक जागेसाठी सुभाष यशवंतराव पाटील,संतोष बाबुराव पाटील,पुरुषोत्तम वसंत शेटे तर संचालक पदासाठी लिना प्रविण पाटील,संतोष बाबुराव पाटील व डॉ.रविंद्र काशिनाथ कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.अजून कोण निवडणूक रिंगणात उतरणार ते स्पष्ट होईल.
उपसमिती कार्यरत
सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक उपसमितीचे अध्यक्ष श्री पंडित चौधरी,सदस्य विवेकानंद भांडारकर,मनोहर महाजन,प्रा.डॉ.सुनिल गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे चिटणीस प्रा.पराग पाटील,प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव,राकेश निळे,भटू चौधरी यांच्या सहाय्याने पार पाडण्यात येत आहे.

