---------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना या भयंकर आजारामुळे केंद्र व राज्यशासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केले असून त्यासाठी कडक नियम केले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण नियमांचे उल्लंघन करीत वारंवार सांगूनही मोटारसायकल,फोरव्हीलर वाहने घेऊन महत्त्वाची कामे नसूनही बाहेर फिरत आहेत. ते त्यांच्या सोबत इतर नागरिकाच्या जीवाशी खेळत आहेत.त्यांना आळा घालून इतर नागरिक सुरक्षित रहावेत त्यासाठी अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे गावाजवळ मोठा पाईप व काटे टाकून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अत्यावश्यकता (इमर्जन्सी) असेल तरच रस्ता सुरू करण्यात येईल याची ग्रामस्थ व पंचक्रोशीतील रहिवाश्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्ता बंद करतांना शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील,निंबा दला चौधरी,जयवंत दगा पाटील, सुभाष दौलत पाटील, महेंद्र गटा पाटील, संतोष मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर दिलीप पाटील, जीवन उत्तम पाटील, युवराज दगा पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.