यांनी केली कारवाई
अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना तालुक्यातील गडखांब शिवारात गट नंबर २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली.सदर माहितीनुसार त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची पुढील कार्यवाहीसाठी परवानगी घेतली. तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनाम्यासाठी सोबत घेतले. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज,पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव ,प्रशांत पाटील,निलेश मोरे,नितीन मनोरे ,सुनील तेली,विनोद सोनवणे,राहुल पाटील,उदय बोरसे,सिद्धांत शिसोदे,गणेश पाटील,संजय सोनवणे,गणेश पाटील,श्यामल पारधी,निलेश पाटील,विनोद पाटील यांनी आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता छापा टाकला.

येथे केली कारवाई
गडखांब येथील सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याने मका पिकासोबत शेतात गांजा लावलेला आढळून आला. सुमारे सहा फूट उंचीची झाडे उगवलेली होती. शेतकऱ्याने शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला.तसेच एका ठिकाणी गांजा वाळवायला ठेवलेला दिसला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांने गांजा विकल्याचे देखील कबुल केले. फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर शेतातील गांजाची सर्व झाडे उपटून मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे. अमळनेर पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
---------------------------------------------------------

