महावितरणची वीज चोरीवर धडक मोहीम अमळनेरात ७० जणांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई




अमळनेर - महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी अमळनेर उपविभाग १ अंतर्गत अमळनेर शहर व परिसरातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटरची तसेच वायरिंगची तपासणी मोहीम महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुरु 
केलेली असून गेल्या महिन्याभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये घरगुती - ६५, व्यवसायिक - ०५ असे एकूण- ७० वीज चोर ग्राहकांनी सुमारे ५७७०० युनटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यात मुख्यत्वे गलवाडे रोड वरील व्यावसायिक ग्राहकांचा देखील समावेश आहे.


कारवाई पथकात यांचा होता सहभाग

सदर धडक मोहिमे करिता कार्यकारी अभियंता धरणगाव विभाग श्री. निलेश सोनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर उपविभाग - १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. टी. एच. नेमाडे साहेब व अमळनेर शहर प्रमुख श्री हेमंत शैंदाने यानी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात आली. अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे


महावितरणचे आवाहन

       यापुढील काळात देखील महावितरण तर्फे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कार्यवाही सुरू राहणार आहे. तरी अधिकृतपणे वीज कनेक्शन घेऊनच वीज वापर करावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.