अमळनेर - संस्थेच्या सुरूवातीच्या काळात संस्था उभारणीत ज्यांनी योगदान दिले आहे त्यांचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी केले. येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव मुख्य शाखा अमळनेरच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम, इमारत उद्घाटन, कोनशीला अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
प्रास्ताविकात जे.एस.पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी बोलतांना सांगितले की, शांताराम शामराव पाटील यांनी पतपेढी सुरू केली. आज संस्थेची सुसज्ज स्वमालकीची इमारत झालीअसून सभासद संख्या ८०५ आहे.९ % दराने व्याजदराने सभासदांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. सुकन्या योजनेत सभासदांच्या मुलीच्या लग्नात ५ हजार रुपयांची मदत देते. तर मयत सभासदाच्या वारसांना ४० हजार रुपये तातडीने देते. संस्था यापुढे चांगल्या सुविधा देण्यासाठी कार्य करेल असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
संस्थापक अध्यक्ष शांताराम
शामराव पाटील,विठ्ठलराव देसाई, जळगाव जिल्हा पतसंस्था माजी अध्यक्ष संभाजी पाटील,आर.बी.
पवार,जळगाव माध्यमिक अध्यक्ष शालिग्राम भिरुड, मारवड हायस्कूलचे चेअरमन जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे, गं.स.
संचालक शामकांत भदाणे, संचालिका विद्या कदम, शिक्षक संघटनेचे रावसाहेब पाटील, शिक्षक भारतीचे नारायण वाघ, मनोहर सूर्यवंशी, धनगर पाटील,डी.सी. पाटील,
पी.बी.पाटील,सुशील भदाणे,तज्ञ संचालक माध्यमिक पतपेढी, आर.डी.चौधरी, सुधाकर देशमुख, एम.ए.पाटील,आर.जे.पाटील,
आर.डी.बोरसे,माजी व्यवस्थापक
लोकनाथ पाटील यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सुलोचना पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव आर.बी.पाटील, खजिनदार कविता पाटील,जे. एस.पाटील, सचिन साळुंखे, तुषार बोरसे,के.यु.बागुल,रमेश चव्हाण आदींनी केले तर सूत्र
संचालन वसुंधरा लांडगे यांनी केले
संस्थेस २५ वर्ष झाल्याने सभासदांना भेट म्हणून ब्लॅंकेट वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिशय आनंद वाटतोय छोट्या वेलीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्था स्थापन झाली तेव्हा ६ महिन्यात कर्जरूपाने २ हजार रुपये वाटप केले.
अडचणीत असलेल्या माध्यमिक शिक्षकाला दिलासा त्यावेळी लाभला. आज इमारत उभी झाली याचा आनंद झाला. कर्ज घेतले तर फेड करावी. लोक कर्ज सूट कधी होईल याची वाट पाहतात. हे संस्थेच्या हितावह नाही.
- शांताराम पाटील,संस्थापक
माझ्या विजयात सर्व शिक्षक,कर्मचारी,नोकरदार यांचा
सिंहाचा वाटा आहे. रोपट्याचा वटवृक्ष होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.अत्यंत अवघड कार्य करत कमी व्याजदरात कर्ज देते आणि संस्था जिवंतराहते.यासाठी कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांची मोठी महत्वाची भूमिका असते. संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे हातभार असतात.पदाधिकारी संस्था डबघाईला नेणारा नसावा. पदाधिकाऱ्यांच्या कामाने संस्थेची दिशा ठरते. वाईट गुण असले तर त्यादृष्टीने संस्थेकडे पाहिले जाते. याची पूर्णपणे खात्री सभासदाला असते म्हणून आपली संस्थेच्या हिताची जबाबदारी येते.जागा घेणे आणि वास्तू तयार करण्यासाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न असतो. दुःखात,संकटात कुटुंबासमोर जटिल प्रश्न उभा असतो. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळत असेल तर सभासदांचे ऋण फेडण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचे कौतुक करावे तितके कमी. सभासदांच्या हितासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असेल तर कदर केली पाहिजे. अध्यक्ष पदावर आणि इतर पदांवर महिला जबाबदारी सांभाळत आहेत. त्या महिलांवर संस्थेची प्रगती करण्याची जबाबदारी आली आहे. या वास्तूसाठी ज्याने कष्ट केले असेल येणाऱ्या दिवसात जिवंत असे पर्यंत त्यांची आठवण येईल.
सर्व जण ही वास्तू सांभाळणार आहेत याची मला खात्री आहे.
-आमदार अनिल पाटील
No comments
Post a Comment