ग्राहक पंचायतीच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील ग्राहक पंचायत शाखेच्या वतीने आज दि.(१५ मार्च ) "जागतिक ग्राहक हक्क दिन" ग्राहक मार्गदर्शन केंद्र सेंट्रल बँके समोर येथे साजरा करण्यात आला. ग्राहक हक्क दिनाची या वर्षाची थिम "२०२० शाश्वत ग्राहक (Sustainable Consumer) याबद्दलची माहिती देण्यात आली. करोना व्हायरस बाबत घ्यावयाची काळजी ,आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, वातावरण बदल बाबत स्वीडन येथील  ग्रेटा थम बर्ग  या युवतीने  जागतिक पातळीवर करीत असलेल्या कार्याबद्दल संपूर्ण जगाने त्याची नोंद घेतली आहे  याची माहिती मकसूद बोहरी यानी दिली. या प्रसंगी ग्राहक हक्क दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सोबतच ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली. ग्राहक तक्रार केंद्रा मार्फत ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे काम केले जात असल्या बद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मकसूद  बोहरी, उपाध्यक्ष अॅड. भारती अग्रवाल, महिला आघाडी प्रमुख सौ वनश्री अमृतकर, सचिव विजय शुक्ला, कोषाध्यक्ष विजय पाने, ऊर्जा मित्र सुनील वाघ, सदस्य हेमंत भांडारकर,अॅड. कुंदन साळुंके,सौ.ज्योतीभावसार, 
सौ अंजू ढवळे, खदिर सादिक व ताहा बुकवाला आदी सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन सचिव विजय  शुक्ल यांनी केले.
--------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.