कोरोनाने राज्यात ओलांडली शंभरी जनतेने घरातच राहून शासन व प्रशासनाच्या प्रयत्नास खंबीर साथ द्यावी-आ.अनिल पाटील

------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना या महाभयंकर विषाणूजन्य आजाराने महाराष्ट्रात शंभर रुग्णांचा आकडा पार केला असून या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन ज्याप्रमाणे सतर्क झाले आहे त्याचप्रमाणे जनतेनेही सतर्क होण्याची आवश्यकता आहे. केवळ शासन आणि प्रशासनातील घटक या संकटाला पळवून लावतील असा समज कुणाचा असेल तर तो भ्रम असून जनता आगामी १४ एप्रिल पर्यंत १०० टक्के घरात बसल्याशिवाय कोरोनावर मात अशक्य आहे असे मत आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
       यासंदर्भात अधिक बोलताना आ.पाटील म्हणाले की इटलीत कोरोनाचे रुग्ण हजारोच्या संख्येत गेल्याने तेथील जनतेची काय अवस्था आहे आणि त्यांचे मृतदेह कसे रस्त्यावर पडून आहेत त्यांची स्थिती आपण टीव्हीवर पहात असून तशी स्थिती आपल्या देशात व राज्यात होऊ नये हाच आपल्या केंद्र आणि राज्य शासनाचा प्रयत्न आहे.कारण आज आपण दुसऱ्या स्टेज वर असताना तिसऱ्या स्टेज वर जाऊ न देण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.त्यास यश देखील येत आहे,मात्र जनतेच्या अहसहकारामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास तिसऱ्या काय हळूहळू पाचव्या आणि सहाव्या स्टेजवर जाण्यास आपल्याला वेळ लागणार नसून नको ते भयावह चित्र आपल्याला  आपल्याच डोळ्यांनी पाहण्याची दुर्देवी वेळ येऊ शकते. यावर शासन गंभीर असल्याने आगामी दि. १४ पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून यादरम्यान जनतेने फक्त आणि फक्त घरातच बसणे अपेक्षित आहे.लॉगआऊट नंतर अमळनेरातील रस्त्यावरील शुकशुकाट समाधानकारक होता,मात्र काही जण उगाचच जीवनावश्यक खरेदीच्या नावाने गंमत पाहण्यासाठी बाहेर पडत असल्याने पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागत आहे.
प्रत्यक्षात जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या  वस्तू दररोज कोणतीही कसरत न करता मिळणारच हे आता सर्वाना कळून चुकले असून त्यासाठी अगदी दररोज बाहेर पडण्याची आवश्यकता मुळीच नाही.दोन तीन दिवसाआड घरातील एक व्यक्ती देखील गरजेच्या वस्तू दिलेल्या वेळेत अगदी सहज जाऊन आणू शकतो.ग्रामिण भागातील जनतेसाठी देखील त्यांच्याच गावात सर्व काही उपलब्ध करून दिले जात आहे,विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतील विक्रेत्यांकडून कोणतीही दरवाढ झालेली नाही,सर्व शाळा कॉलेज,शासकीय कार्यालय देखील बंदच आहे यामुळे कुणालाही विनाकारण बाहेर पडण्याची आवश्यकता नसून जळगाव जिल्ह्यात अमळनेर मतदारसंघातील जनता २१  दिवस शंभर टक्के घरात राहून या  लढाईत सहभागी असल्याचे आपल्याला दाखवून द्यायचे आहे.प्रशासनातील महसूल अधिकारी आरोग्य विभाग, डॉक्टर्स,पोलीस,पंचायत समिती तसेच पालिका प्रशासन व कर्मचारी आणि पत्रकार बांधव आपल्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर आहेत,त्यांना आपली साथ देण्याची गरज आहे,आपले कुटुंब,आपले नातेवाईक,आपला मित्रपरिवार ,आपले हितचिंतक,आपले गाव,आपला तालुका,
आपला जिल्हा,आपले राज्य आणि आपला देश कोरोनापासून वाचवायचा असेल तर फक्त आणि फक्त घरात बसा आणि या युद्धातील सैनिक बना अशी आवाहन वजा विनंती आ.पाटील यांनी केली आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.