राज्यात १४ एप्रिल नंतरही लॉकडाऊन सुरूच राहणार मुख्यमंत्र्यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची केली घोषणा

-----------------------------------------------------------------------------
               - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
मुंबई  -
राज्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे नष्टकरण्यासाठी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी दि. ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रकोप बऱ्यापैकी आटोक्यात आला असला तरी काही राज्यांमध्ये याची स्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी देशातील बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी आधीच हा कालावधी वाढण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमिवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा केली. यानंतर राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी दि. ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सायंकाळी पाच वाजता राज्यातील जनतेला केलेल्या संबोधनात याबाबतची घोषणा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे
 ✴️ मुंबई व पुणे येथे कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. 
✴️ राज्यात आजवर ३३ हजार चाचण्या झाल्या असून यातील १९ हजार हे मुंबईतील आहेत. 
✴️ मुंबईत याचे प्रमाण जास्त असले तरी जिथे रूग्ण आढळले त्या भागाला प्रशासनाने पूर्णपणे सील केले आहे. यामुळे या भागातील प्रसार आटोक्यात आला आहे. 
✴️ कोरोनाचा धोका हा ६० वर्षावरील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 
✴️ ज्येष्ठांना जपण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन 
✴️कोरोनाचा गुणाकार कमी झाला असून हा दर शून्यावर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील 
✴️ दि.१४ तारखेनंतर लॉकडाऊन कायम असले तरी कृषीसह अन्य अत्यावश्यक बाबींची वाहतूक चालू रहाणार आहे.
          वरील प्रमाणे महत्वाच्या  घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्या आहेत.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.