अमळनेरात २४ तासात ३ रूग्ण कोरोना बाधित अमळनेर बनतयं कोरोना हॉटस्पॉट

----------------------------------------------------------------------
               - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. या चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात अमळनेर शहरातील तीघांचा समावेश आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अमळनेर तालुका कोरोना आजाराचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे. 

         आज अहवाल प्राप्त झालेल्या या कोरोना बाधित रूग्णांपैकी तीन रूग्ण अमळनेर 
येथील असून एक रूग्ण हा भुसावळ येथील आहे. 
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या अठरा झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.
अमळनेरात खळबळ
       अमळनेर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जनतेत खळबळ उडाली आहे. प्रशासन देत असलेल्या सुचनांचे पालन केले तर आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. अमळनेर शहरातील शाहआलम नगर,अमलेश्वर नगर,परमेश्वर नगर आणि साळी वाडा हा परिसर या आजाराचे केंद्र ठरला आहे. संख्येत वाढ होत असल्याने  आता तालुक्यात रेड झोन घोषित केला जाऊ शकतो अशी चर्चाही जनतेत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.