-----------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे. तसेच इयत्ता ९ वी व ११ वी या वर्गाच्या परिक्षाही यावर्षी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी विधान परिषद सदस्या आ. स्मिताताई वाघ यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली होती. प्रा. वर्षा गायकवाड यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांनी दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्याबाबत शिक्षण मंडळाच्या विहित कार्यपद्धती नुसार निर्णय घेण्याचे निर्देश मंडळ दिल्याचे जाहिर केले आहे. त्याचप्रमाणे इयत्ता ९ वी व ११ वी या वर्गाच्या परिक्षाही यावर्षी घेण्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येतील असा आदेश मंत्री ना.प्रा. वर्षा गायकवाड जाहीर केला आहे. मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आ.स्मिताताई वाघ यांनी प्रा.वर्षा गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहेत.




