संत निरंकारी मंडळाकडून मदतीचा हात

------------------------------------------------------------------------
               - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर -
देशात सध्या लॉकडाऊन मुळे सर्वत्र हाताला काम नाही त्यामुळे रोजंदारी करून उदरनिर्वाह करणा-या अनेक कुटुंबापुढे अडचणी येत आहेत. त्यामुळे संत निरंकारी मंडळ दिल्ली,शाखा अमळनेर यांच्या वतीने परिसरातील गरजू कुटुंबांना चांगल्या प्रतीचे धान्य व जीवनावश्यक वस्तू देऊन मानवतेचा धर्म जोपासण्यात आला. 
       सध्या कोरोणाच्या साथीने थैमान घातले असून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन घोषित केल्याने सर्व कामे थांबली आहेत दररोज रोजंदारी करून उपजीविका करणाऱ्यांना काम नसल्याने त्यांच्या उपजीविकेस अडचण येत आहे. संत निरंकारी मंडळ दिल्ली या आध्यात्मिक मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी अडचणीत आलेल्या परिवारांना आवश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी निरंकारी मंडळाच्या सर्व शाखांना सुचित केले आहे.
संत निरंकारी मंडळ शाखा अमळनेर यांच्या वतीने या आदेशानुसार अमळनेर व  परिसरातील गरजूंना गव्हाचे पीठ(पॅकिंग),तांदूळ,साखर,चहा,डाळ,तेल,साबण या जीवनावश्यक वस्तू संत निरंकारी सत्संग भवन अमळनेर येथे वितरीत करत मानव सेवेत योगदान दिले.
          अत्यंत अडचणीच्या वेळी जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने फार मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी कोरोना व्हायरस बाबत दक्षता घेत सुरक्षित अंतर, मास्क, सॅनेटायझर आदि प्राथमिक उपाय योजनेचेही तंतोतंत पालन करण्यात आले. यावेळी शाखेचे प्रमुख श्रीचंद निरंकारी सेवादल संचालक कैलास डिंगराई,ज्ञानचंद निरंकारी, रामचंद ठाराणी,जितेंद्र डिगंराई,गणेश जाधव,विरेन्दर केसरी'सुनिल बठेज,सुरज पंजवाणी,हितेश डिगंराई,सेहज डिगंराई,लश डिगंराई आणि इतर सेवादल महात्मा यावेळी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.