--------------------------------------------------------
अमळनेर - येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. सद्या राज्यात रक्तसाठा कमी आहे. या पार्श्वभूमीवर रक्त संकलन करणे खूप आवश्यक व अंत्यत गरजेचे आहे. सदर बाब लक्षात घेऊन अमळनेर शहर व तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन मा. आ. स्मिताताई उदयजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५४ बॅग रक्तदान केले व राज्याच्या कठीण वेळी सामाजिक भान ठेवत रक्तदान करून हातभार लावला.
याप्रसंगी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. स्मिताताई वाघ,ॲड. ललिताताई पाटील, पंचायत समितीचे सभापती शाम बापू अहिरे,भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, संचालक पराग पाटील,तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, सरचिटणीस राकेश पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील,भूषण देवरे, जगदीश पाटील यांचेसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments
Post a Comment