आदिवासी एकता संघर्ष समितीचा एस.टी.कर्मचारी आंदोलनास पाठींबा प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांनी घेतली आंदोलनकर्ते आणि आगार प्रमुखांची भेट

Saturday, November 13, 2021

/ by Amalner Headlines
अमळनेर - राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संप पुकारला आहे.या पार्श्वभूमीवर आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांनी काल अमळनेर बस स्थानकात सर्व आंदोलनकर्त्यांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या,चर्चा केली आणि सर्व न्याय हक्कांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या ह्या संपास पाठींबा दिला आहे.
आगार प्रमुखांना दिले निवेदन
              आज घेतलेल्या भेटीत आगार प्रमुख अर्चना भदाणे यांना देखील निवेदन देत चर्चा करून  सर्व आंदोलनकर्त्याना सहानुभूती पूर्वक सहकार्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आंदोलनास पाठिंबा
               आंदोलनकर्त्या एस.टी. कर्मचाऱ्यांना संबोधित करत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लालपरीच्या 'लाल' ने घाबरून न जाता, स्वतःला एकटे न समजता ह्या संघर्षात आदिवासी एकता संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे आश्वासन देत आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले. एकता मजबूत ठेवा विजय निश्चित आहे.अडचणी येतील पण त्यावर सर्वांनी एकत्र पणे लढा देऊन सनदशीर मार्गाने विजय मिळवू अशी आशा व्यक्त केली आहे.
                एस.टी.च्या सर्व सेवक वर्ग/कर्मचारी यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनास पाठींबा दिला. खरं पाहता महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात एस.टी. बस फक्त आमचे बांधवच नेऊ शकतात.
जिवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस, थंडी, रात्री-बेरात्री हेच बांधव प्रामाणिक सेवा देतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा उपाशीपोटी अविरत हे कार्य सुरू असते. त्यात कधी कधी मिळणाऱ्या पगारात कुटुंबाचा गाडा ओढता येत नाही. अनेक प्रसंगांना तोंड देत कर्मचारी एस.टी.ला जीव लावतात.
तरीही या आमच्या बांधवांवर अशी वेळ का येते ? त्यांना आत्महत्या का करावी लागते ? एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी असुन त्यांची हेळसांड का होतेय ? संपकाळात खाजगी व्यापार मात्र जोरात चालतो. जनतेची लुट सुरू होते, त्यावर मात्र कोणाचे नियंत्रण नाही, मज्जाव नाही, शासन हे सर्व बघते मात्र त्याविरूध्द बोलायचे नाही, यापेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांना बळ यावे.
सरकारने आपलं डोकं ठिकाणावर ठेवून विचार करावा, आजही ग्रामीण जनता एस.टी.ला सर्वस्व मानते. तरी आमच्या या बांधवांवर कुठलेही गुन्हे दाखल न करता त्यांना न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असुन सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,  परिवहन मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.

1 comment

maerynjago said...

Tritanium dioxide in food | TITaniumArt
The Tritanium titanium granite countertops is one of the most common types of food. fallout 76 black titanium This titanium hair trimmer as seen on tv type of chile pepper is titanium auto sales one titanium gold of the hottest chili peppers in the world.

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines