अमळनेर - तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असतांना आमदार अनिल पाटलांनी एस.आर प्रोग्रॅम अंतर्गत या रस्त्यासाठी ४० लाख रुपये निधी मंजूर केल्याने अतिशय थाटात या रस्त्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.
रस्त्याची होती दुरावस्था
दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असतांना गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने येथून जातांना ग्रामस्थांची मोठीच कसरत होत होती. यामुळे आमदारांनी हा प्रश्न मनावर घेऊन निधी मंजूर करून आणल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन प्रसंगी सरपंच सौ. सुषमा देसले व ग्रामस्थांनी नवीन पाणीपुरवठा व रस्ता काँक्रीटीकरनाची मागणी केली, तर धनगर समाजाने स्मारकाची मागणी केली,ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही आमदारांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील,पं.स. चे माजी उपसभापती सुभाष देसले ,माजी जि.प.सदस्य अशोक पाटील,जयवंत गुलाबराव पाटील,मार्केटचे प्रशासक सदस्य एल.टी. पाटील,उपसरपंच बाळू आत्माराम पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील,ग्रा.पं. सदस्य शिवाजी पारधी, वर्षा पाटील, रेखाबाई पाटील,रवींद्र माळी, दत्तात्रय देसले, गोकुळ माळी, किशोर पाटील,सुकलाल पारधी ,बापू सोनवणे ,भिला नाना,संजय देसले,ईसवर माळी,भुषण भदाणे,गुलाब पाटील, बापू पाटील,
रवींद्र पाटील,राजेंद्र पाटील,अशोक पाटील,गुलाब सर,दिलिप पाटील,ज्ञानेश्वर पाटील,भानुदास लोहार, दिलीप माळी,भाऊराव पाटील,स्वप्निल पाटील,नरसिंह देसले,सुधाकर पाटील,आनंदा पाटील,राजेंद्र पारधी,भिकन सोनवणे, राहुल माळी, बाळू सोनार,नाना पाटील,पंडित पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,सदर काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.
...............................................................
No comments
Post a Comment