मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ

तालुका मराठा समाजातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

*अमळनेर* - तालुका मराठा समाज अमळनेरतर्फे आज रविवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पदमश्री पुरस्कार प्राप्त तथा राज्याचे विशेष सरकारी वकील अँड उज्वल निकम यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल भाईदास पाटील हे राहणार आहेत 
              इयत्ता १० वी, १२ वी, विविध पदवी परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंताचा सत्कार सोहळा येथील कै. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असून ह्या सोहळ्याला अमळनेर तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती द्यावी असे अवाहन अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.