तंत्रशोधक पध्दतीने लावला हरवलेल्या ३७ मोबाईलचा छडा

अमळनेर डीवायएसपी कार्यालयातील पथकाची सतर्कता व तत्परता


*अमळनेर* : येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले ३७ मोबाईल मिळून आले असून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
     सर्वसाधारणपणे मोबाईल हरवणे नित्याची बाब झाली आहे. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळून येण्याचे प्रमाण अगदी किरकोळ आहे. बऱ्याचदा पोलीस देखील प्रयत्न करीत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

*अशी राबवली शोध मोहीम*

डीवायएसपी सुनील नंदवाळकर  यांनी तंत्रज्ञ पोलीस उज्वल पाटील यांच्यावर मोबाईल शोधायची जबाबदारी टाकली. उज्वल पाटील यांनी तांत्रीक यंत्रणा वापरली असता हरवलेले ३७ मोबाईल राजस्थान ,गुजरात , नाशिक ,पंढरपूर ,अमरावती ,मालेगाव ,भुसावळ ,जळगाव ,धुळे   आदी ठिकाणी असल्याचे शोधून काढले. त्यांनंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या त्या व्यक्तींकडून मोबाईल जप्त करण्यात आले. उज्वल पाटील ,हितेश बेहरे  यांनी विविध ठिकाणाहून मोबाईल परत आणले. आणि मूळ मालकांशी संपर्क करून त्यांना परत देण्यात येत आहेत. 

*डीवायएसपी यांनी केले आवाहन*

     नागरिकांनी आपले मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेऊ नये असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.