मतदानरूपी प्रेमाची परतफेड विकास कामांनी झाल्याने जनता समाधानी - भिकेश पाटील

अमळनेर* - विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड विकास कामांच्या रूपाने केल्याने जनता समाधानी झाली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा अमळनेर प.स.चे उपसभापती भिकेश पावभा पाटील यांनी दिली.
         गटातील विकास कामांसंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना,सामाजिक सभागृह, गावा-गावाना जोडणारे दर्जेदार रस्ते, स्वागतासाठी आकर्षक व सुंदर असे प्रवेशद्वार, शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर प्लांट, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय इमारती,गाव अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणं, संरक्षण भिंत,पादचारी पूल, स्मशानभूमी व सांत्वनशेड, बालगोपालांसाठी अंगणवाडी व शाळा इमारती, शाळा संरक्षण भिंत, शाळा डिजिटल साहित्य, तरुणाईसाठी अभ्यासिका, व्यायाम शाळा व व्यायाम साहित्य,दलित व भिल्ल वस्तीत विविध विकासकामे, स्मारक व चौक सुशोभीकरण,शेत-शिवार रस्ते, तीर्थक्षेत्र व रोजगार हमी अंतर्गत विकामकामे,आरोग्य उपकेंद्रासाठी विविध आरोग्य साहित्य पुरवठा, अल्पसंख्याक समाजासाठी विविध विकासकामे, नवीन विद्युत डीपी, पोल, तारा असे एक गाव नाही जेथे भूमीपुत्र अनिलदादांचे विकास काम नाही. पांझरा नदीचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी शहापुर, बाम्हणे येथे बंधारे टाकून पाणी अडवले गेल्याने या परिसरातील गावांमधील शेतकरी राजास सुखी व समृद्ध होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हा आमचा विश्वास आहे.

मुडी येथील फड बंधारा देखील याच भूमीपुत्राने पुनर्जीवित करून त्यासोबतच मांडळ येथील ब्रिटिश कालीन कालवा देखील पुनर्जीवित करून पांझरेचे पाणी लवखी व भाला नाल्यात टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्याने व लवखी नाल्यावर विविध बांध-बंधाऱ्यामुळे सुमारे २०ते २२ गावांना ही एक अनमोल भेट आहे.
      विकासात्मक दृष्टी असलेले मंत्री अनिल पाटील हे आमचे महायुतीचे उमेदवार असल्याने आणि आमच्या परिसरात भाजप विचारांचे अधिक प्राबल्य असल्याने अनिल दादांसाठी अतिशय पूरक असे वातावरण असून जनता निश्चितच भरभरून मतदान त्यांच्या पारड्यात टाकून राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठींचे हात बळकट करेल असा विश्वास ही भिकेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.