अमळनेरमध्ये ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२६’चा भव्य जागर!



७० हून अधिक विभागांच्या योजना एकाच छताखाली; ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान भव्य प्रदर्शन


अमळनेर - केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम,विकासकामे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी अमळनेर येथे ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७, ८ आणि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी धुळे रोडवरील कलागुरु मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
         या उपक्रमाची माहिती खासदार स्मिताताई वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फ्रेंडस् एक्झिबिशन अॅड प्रमोशनचे पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये
 
       शासनाच्या ७० हून अधिक विभागांचा सहभाग.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली मिळणार आहे.

▪️ शासकीय योजनांची थेट माहिती - नागरिकांना विविध सरकारी योजनांची पात्रता, उद्देश आणि उपलब्ध सुविधांची माहिती मिळणार आहे.

▪️ शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती - कृषी व फलोत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, योजना आणि विकासकामांची माहिती उपलब्ध होणार आहे.

▪️ युवक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन - शिक्षण,तंत्रज्ञान, रोजगाराशी संबंधित संधी आणि विविध शासकीय उपक्रमांची माहिती मिळणार आहे.

▪️ महिला व उद्योजकांसाठी उपयुक्त - वित्त, बँकिंग, विमा, व्यापार आणि उद्योगाशी संबंधित योजनांची माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे.

▪️ आरोग्य व जीवनशैली - 
आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि संबंधित शासकीय उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.

▪️ आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन - विज्ञान,तंत्रज्ञान, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान तसेच संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती नागरिकांना मिळणार आहे.

▪️ पर्यावरण व ऊर्जा क्षेत्रावर भर - ऊर्जा,पर्यावरण आणि शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती प्रदर्शनात असणार आहे.

🟨 सहभागी प्रमुख विभाग

कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य व निरोगी जीवनशैली, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला, हातमाग, रसायने व खते आदी क्षेत्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.

🔵 अधिकारी व तज्ज्ञ देणार मार्गदर्शन - विविध शासकीय विभागांचे अधिकारी, डायरेक्टर आणि सायंटिस्ट प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना योजनांबाबत असलेल्या प्रश्नांची माहिती थेट संबंधित विभागाकडून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

🟩 जळगावनंतर अमळनेरमध्ये आयोजन

गेल्या वर्षी हे प्रदर्शन जळगाव येथील जी.एस. ग्राउंडवर आयोजित करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा अमळनेरमध्ये आयोजन करण्यात आल्याने तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

🔴 ७ ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा

प्रदर्शनाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. संयोजक फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशनचे चेअरमन आनंद पाल यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

📌 प्रदर्शनाची माहिती
दिनांक : ७, ८ व ९ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५.३०
स्थळ : कलागुरु मंगल कार्यालय, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव


 

               आवाहन : -

अमळनेरसह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि आधुनिक विकासाची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.