अमळनेर नपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी फिरोज मिस्तरी मा.आ. शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराने मुस्लिम समाजातील सदस्यास दिली स्वीकृत नगरसेवक पदाची संधी

Tuesday, December 31, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर-
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुस्लीम समाज बांधवांना दिलेल्या शब्दानुसार फिरोज मिस्तरी यांना अमळनेर नपाच्या स्वीकृत नगरसेवक पदाची दिली संधी आहे. माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवाराच्या नगरसेवकांनी सुचित केलेले विद्यमान स्विकृत नगरसेवक अॅड. सुरेख सोनवणे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर निवड करण्यासाठी नगरसेवकांची एक बैठक घेण्यात आली. सूतगिरणीचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाजाला न्याय मिळावा या हेतूने यावेळी मुस्लिम समाजाला नगरपरिषदेत स्थान दिले जावे असे ठरविण्यात आले.त्यात माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी गटनेते प्रविण पाठक,नगरसेवक सलीम टोपी, सौ. सविता संदानशिव,श्याम पाटील,श्रीमती मायाबाई लोहरे, सौ किरणबाई जाधव,नरेंद्र चौधरी,सौ ज्योती महाजन, सौ कल्पना चौधरी, सौ रत्नमाला महाजन सर्व नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते पकंज चौधरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमळनेर नपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी फिरोज मिस्तरी यांच्या नावास मंजुरी देण्यात आली. मा.आ.शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराच्या नगरसेवकांच्या बैठक प्रसंगी     मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते निवडीबद्दल त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी व मित्र परिवाराचे आभार मानले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines