------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशाखेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कोरोना योद्धयांचा आज गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सत्कारामुळे भारावलेल्या कर्मचा-यांनी अभाविपला धन्यवाद देत आता उत्साह अधिक वाढणार असल्याची भावना व्यक्त केली. कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी,पत्रकार,पोलीस अधिकारी, कर्मचारी,सफाई कामगार, नगरपालिका कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, प्रताप कोविड सेंटर मधील डॉक्टर, सर्व कर्मचारी, शहरातील विविध भागात कोरोनाच्या कालावधीत आपली सेवा देत असलेले पोलीस बांधव या सर्व अधिकारी - कर्मचारी बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व अभाविपने त्यांचे आभार मानले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्वागत केले. अभाविपने निरपेक्ष भावनेतून आमचा सत्कार केला त्यामुळे आता आमचा उत्साह वाढला आहे अश्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

या योद्धयांचा केला सन्मान

यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,पो.ना.शरद पाटील, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे,जितेंद्र पाटील,राजेंद्र पोतदार,महेंद्र पाटील,सामाजिक कार्यकर्ते भरत पवार,कोव्हीड केअर सेंटर येथील डॉ प्रकाश ताडे,अधिपरिचारीका,परिचारिका,पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी,कोव्हीड केअर सेंटर मधील सुरक्षा कर्मचारी,पो.ना.योगेश महाजन,पत्रकार आणि अपंग क्रांती प्रहारचे शहराध्यक्ष योगेश पवार यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यकर्त्यांची उपस्थिती

यावेळी अभाविप अमळनेर शहरमंत्री निलेश पवार , सहमंत्री प्रितेश पाटील, विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, वैभव पाटील, केशव पाटील, पवन सातपुते, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments
Post a Comment