डॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउन्टर अमळनेरकरांनीही केले हैद्राबाद पोलिसांचे अभिनंदन
अमळनेर - हैदराबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या बलात्कार व हत्येची नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली होती. या घटनेनंतर देशभर निषेध,मुकमोर्चा,निदर्शने करण्यात येत होती. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. तपासकामी आरोपींना पोलीसांनी आज पहाटे घटनास्थळी आणले असता आरोपींनी पोलिसांवरच हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांच्या गोळीबारात चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले. त्यामुळे देशभरातून त्या पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
अमळनेर येथे मामाजी ट्रान्सपोर्ट आंबेडकर चौक येथे डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून प्रतिकात्मक म्हणुन अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी एएसआय मधुकर पाटील शरद पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,डॉ. संजय शहा, वसंत मराठे,नगरसेवक सलीम टोपी, प्रमोद पाटील, दीपक माळी, महेंद्र पाटील, बशीर उद्दीन नजमुद्दिन, अहमद अली दस्तगीर, रिजवान खान मेहमूद खा, मुन्ना शेख, कमालुद्दीन मुजावर, चिराग उद्दीन शफी उद्दीन, रहीम खा पठाण,अरुण चौधरी, राजू चौधरी, तुषार चौधरी,मनीष पाटील,डीएस बडगुजर आदी उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment