भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी हरीभाऊ जावळे बिनविरोध

जळगाव -
भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी यांची माजी आमदार हरिभाऊ जावळे निवड करण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हाध्यक्ष  निवडीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यामध्ये माजी आ. हरिभाऊ जावळे, भुसावळचे अजय भोळे, डॉ संजीव पाटील, पोपट भोळे, पी सी पाटील , आ. स्मिता वाघ यांची जिल्हा अध्यक्षपदा करीता नावे चर्चेत होती, मात्र पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेत माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बैठकी दरम्यान जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे यांच्यावर शाई फेकल्याचा वाद शांत झाल्यानंतर देखील तणावाचे वातावरण कायम असताना जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक पार पाडण्यात आली आहे.
      भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे,माजी मंत्री गिरीश महाजन,खा.उन्मेष पाटील,खा.रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, आ.चंदूलाल पाटील,आ.संजय सावकारे,आ.स्मिता वाघ,जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, डॉ संजीव पाटील यांच्या सह मान्यवरांनी सत्कार करीत माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.