अमळनेर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध सर्व विद्यमान सभापतींची फेरनिवड,तर शिक्षण सभापतीपदी सौ.नूतन पाटील यांची निवड

अमळनेर -
येथील न.प.च्या दि. ९ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली. शिक्षण विभाग वगळता अन्य सर्व विभागाच्या सभापतींची फेरनिवड करण्यात आली.तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ.नुतन महेश पाटील यांची निवड करण्यात आली.
                न.पा.च्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ होते. तर सभागृहात 
नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद
लांबोळे यासह सर्व सदस्य उपस्थित होते. याआधी सर्व
विषय समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड यापूर्वीच सभागृहात करण्यात आली होती. तर स्थायी समितीच्या सदस्यपदी   तिघांची वर्णी लागली होती. जिल्हाधिकारी यांचे
आदेशानुसार पुन्हा सभा होऊन विषय समिती सदस्यांमधून सभापतींची निवड करण्यात आली. यात
बांधकाम सभापती- सुरेश आत्माराम पाटील, पाणीपुरवठा
सभापती- राजेश शिवाजीराव पाटील, महिला व बालकल्याण
सभापती- निशानबानो अनिसखा कुरेशी, आरोग्य
स्वच्छता समिती सभापती- सौ.राधाबाई संजय पवार,
शिक्षण समिती सभापती- सौ.नूतन महेश पाटील,
 नियोजन समिती सभापती- उपनगराध्यक्ष पदसिद्ध तर महिला व
बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी शिरीषदादा मित्र
परिवार आघाडीच्या सौ.ज्योती धनंजय महाजन यांची
निवड करण्यात आली. सर्वांच्या नावाची घोषणा पिठासन
अधिकाऱ्यांनी केली. सदर सभेसाठी मुख्याधिकारी शोभा
बाविस्कर, उपमुख्याधिकारी गायकवाड, संजय चौधरी
आणि सभा लिपिक महेश जोशी यांचे सहकार्य लाभले.
सदर निवडीनंतर माजी आ.कृषिभूषण पाटील, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांच्यासह सर्व मान्यवर व उपस्थित सदस्यांनी
नूतन सभापतींचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीच्या
वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली. सर्व सभापतींनी
पुन्हा काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आ.कृषिभूषण पाटील, नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील व नगरसेवकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.