अमळनेर - तालुक्यातील दहिवद येथील शासकीय आश्रम शाळेतर्फे श्री पन्नालाल मावळे यांचा वीर एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्रम शाळेत मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन.व्हि. शिरसाठ सर होते.
श्री पन्नालाल मावळे यांच्या कार्याबद्दल रूपाली बारेला, राधा बारेला,निलेश बारेला,अशोक बारेला,विनेश बारेला,आकाश बारेला या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पन्नालाल मावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारले होते तेव्हा एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरू माणून द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला व त्यासमोर बसुन धनुर्विद्येचे शिक्षण घेतले. जेव्हा द्रोणाचार्यांना कळले की एकलव्य मला गुरू माणून धनुर्विद्या शिकला तेव्हा द्रोणाचार्यांनी गुरूदक्षिणा म्हणून एकलव्यचा उजव्या हाताचा अंगठा मागीतला. तेव्हा एकलव्यने हि गुरूचा आदर करत उजव्या हाताचा अंगठा कापुन दिला. द्रोणाचार्याने एकलव्याला शिक्षण दिले नाही. त्याला शिक्षण नाकारले तरीही एकलव्यने द्रोणाचार्याला गुरू मानत त्यांचा आदर केला तर मग तुम्ही तुम्हाला खरोखर शिक्षण देणारे आपल्या आश्रम शाळेच्या शिक्षकांचा गुरुजनांचा योग्य तो आदर केलाच पाहिजे
- पन्नालाल मावळे

शाळेचे मुख्याध्यापक श्री एन.व्हि. शिरसाठ सर, अधिक्षक श्री गणेश तांदळे सर, सह माध्य शिक्षक श्री बोरसे सर यांनीही पन्नालाल मावळे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. या वेळी आदिवासी पारधी विकास परिषदेचे कोषाध्यक्ष श्री पंडीत चव्हाण,तालुकाध्यक्ष श्री अविनाश पवार,संदिप सुर्यवंशी विजय संदानशिव,आश्रम शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका श्रीमती वैशाली पाटील यांनी केले आभार श्री व्हि.आर. पाटील सरांनी मानले.



