अमळनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. शकील काझी विजयी उपाध्यक्ष -सचिव पदांचे उमेदवार बिनविरोध

अमळनेर-
अमळनेर वकील संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड.शकील काझी हे निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.विवेकानंद लाठी हे पराभूत झाले.
     अमळनेर वकील संघाच्या कार्यकारीणी निवडीच्या या प्रक्रियेत उपाध्यक्ष व सचिव पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात उपाध्यक्ष पदासाठी अॅड. संभाजी पाटील (निम) तर सचिवपदी अॅड.दिनेश पाटील (एकलहरे) हे बिनविरोध निवडून आले. या दोन्हीही पदांसाठी या दोघा व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल केला नव्हता हे विशेष म्हणावे लागेल. 
    निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. अशोक बोरसे यांनी काम पाहिले. त्यांना याकामी अँड. केशवराव कुलकर्णी यांनी सहाय्य केले.सिनियर तसेच जुनियर सर्व सभासदांनी ह्या निवडणुक प्रक्रियेत भाग घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणुक पार पडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.