पन्नालाल मावळे यांना वीर एकलव्य पुरस्कार प्रदान

अमळनेर -
तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी, लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते व आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे यांना वीर एकलव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
            खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र ,शाखा-सुरत (गुजरात) जिल्हा शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सुरत येथे आयोजित आंतरराज्य बहुभाषिक कविसंमेलनात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या कार्यक्रमात पन्नालाल मावळे यांना "विर एकलव्य पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रत्नाताई पाटील, सौ वंदनाताई पाटिल, प्रविण पवार,महेंद्र भदाणे,विकास पाटील, जितेंद्र बहारे,संजय पाटील सह लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे झुंजार कार्यकर्ते प्रकाश पारधी,पंडीत चव्हाण,अविनाश पवार,संदिप सुर्यवंशी,अनिल माळी,किशोर हाडपे,भुरा महाजन, अशोक पवार सुरत, देविदास सुर्यवंशी, शिवाजी साळूंके आदींसह कार्यकर्ते हजर होते.श्री पन्नालाल मावळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.