अमळनेर - येथील तांबेपूरा भागातील कनिष्क फाऊंडेशन संचलीत सी.आर.पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांच्या उपस्थितीने स्नेहसंमेलन रंगतदार झाले.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनप्रसंगी विधान परिषद सदस्या आ.श्रीमती स्मिता उदय वाघ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,
एस.जे.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर जाधव, तेजोमय फाऊंडेशनच्या संचालक सीमा जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रम,अभिनय,नृत्य सादर केले. लहान मुलांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास मान्यवरांसह संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील व प्राचार्य सौ.नुतन पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भारती पाटील,जागृती पाटील व आभार प्रदर्शन सौ. राज नंदिनी पाटील,जागृती पाटील यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------



