बहुजन क्रांती मोर्चातर्फे २९ ला भारत बंद पुरोगामी संघटनांच्या वतीने अमळनेर बंदचे आवाहन

अमळनेर - येथिल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारने लादलेल्या हिंदूंसह सर्वच मुस्लिम व इतर धर्मियांना धोकेदायक ठरणाऱ्या एनआरसी,सीएए कायद्याच्या विरोधात भारत बंद आंदोलनांतर्गत दि. २९ जानेवारीला अमळनेर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे.
                   देशातील १३५ कोटी भारतीय नागरिकांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारायला लावून त्यांच्या जगण्याचा अधिकारही हिरावून घेण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने एनआरसी कायद्याच्या माध्यमातून रचलेले आहे. या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध टॅक्सी-रिक्षा युनियन ,व्यावसायिक व व्यापारी संघटनांना व पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून जाहिर आवाहन केलेले असून अमळनेर शहरातील अनेक संघटना  बहुजन,आदिवासी, दलित,मुस्लिम,ओबीसी तसेच युवकांच्या संघटना या बंद आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केलेले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने अमळनेर शहरातील चौकात भारत बंदचे फलक लावण्यात आलेले आहेत. जनजागृती करणारे प्रचार पत्रकही वाटण्यात आलेले आहेत.विविध भागात या जाचक एनआरसी कायद्याच्या संदर्भात कॉर्नर बैठका घेऊन बहुजन क्रांती मोर्चा व इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने उत्स्फूर्त बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
-------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.