सिंधी कॉलनीत नववर्षाच्या स्वागतासाठी सत्संगाचे आयोजन गुरू गोविंदसिंह जयंतीनिमित्त २ रोजी उत्साहात निघाली प्रभातफेरी


अमळनेर -
येथील चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीत सन २०२० या नववर्षाच्या स्वागतासाठी संत हासाराम दरबार येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. मावळत्या वर्षास निरोप व नविन वर्षाचे स्वागत यासाठी अध्यात्मिक वातावरण निर्माण होईल असा अनोखा उपक्रम मागील ४-५ वर्षापासून राबविण्यात येत आहे. यावर्षीही रात्री श्री रिंकू भाईसाहेब यांचे प्रवचन प्रोजेक्टरवर दाखविण्यात आले. सर्व सिंधी समाज बांधवांनी व महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. 

 श्री गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त दि. २ जानेवारी रोजी सकाळी सिंधी कॉलनीतील धर्मप्रेमी समाज बांधवांनी जयघोष करीत व धार्मिक गीते म्हणत प्रभातफेरी काढली.गुरू गोविंदसिंह यांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने धर्मासाठी आपले जीवन अर्पण करून धर्माचे रक्षण केले याची आठवण मनात जागृत ठेऊन या कार्यक्रमाद्वारे श्री गुरू गोविंदसिंह यांना अभिवादन करण्यात आले.प्रभातफेरी नंतर उपस्थित सर्वांना प्रसाद देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.