अमळनेर - तालुक्याचे माजी आमदार आप्पासो अमृतराव वामनराव पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी आज दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्राणज्योत मालवली. त्यांचेवर शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ढेकू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गाव पातळीवरील राजकीय व सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या आप्पांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,जिल्हा सहकारी बॅंक,दूध फेडरेशन या संस्थांमध्येही तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी चुरशीच्या निवडणूकीत विजय मिळवून विधीमंडळात तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते.ग्रामीण भागाच्या प्रश्नांची जाणीव असलेले मितभाषी व अजातशत्रू असे सुसंस्कृत नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील एक जाणते नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे.
अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली



