आ.स्मिता वाघ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातील महिला पदाधिका-यांसह प्रचारात सहभाग

अमळनेर - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत आहे. भाजपाने दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी जोरदार व्युहरचना केली आहे. देशाच्या विविध भागातील पक्ष पदाधिकारी प्रचारासाठी दिल्लीच्या विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील पदाधिकारीही प्रचारात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचार कार्यात गुंतले आहेत.
 तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या आ.स्मिता ताई वाघ यांच्यासह सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका,नाशिक येथील महिला पदाधिकारी यांच्या टीमनेही दिल्लीतील प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी,कॉर्नर सभा,चौक सभा याद्वारे संवाद साधला जात आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.