पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधींना सामूहिक अभिवादन उपविभागीय कार्यालयाबाहेर मान्यवरांनी हुतात्म्यांना अर्पण केली श्रद्धांजली

अमळनेर-
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात येते.त्यानिमीत्त आज सकाळी येथील उपविभागीय कार्यालयासमोर मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी २ मिनिटे स्तब्ध उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली व महात्मा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन केले. 
    या कार्यक्रमाला माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील,उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, कामगार नेते रामभाऊ संदानशीव ,जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुलोचना वाघ, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोकुळ पाटील,शहराध्यक्ष मनोज पाटील, श्रावण पाटील,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,भारती गाला,नगरसेवक शेखा हाजी , सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र बाळू पाटील,सत्तार तेली,फयाज पठाण,अलिम मुजावर,सईद तेली,सनी गायकवाड,शिरस्तेदार राजेंद्र चौधरी,नायब तहसीलदार धिवरे हजर होते.यावेळी रॉयल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी तिरंग्याचे गणवेश घातले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.