अमळनेर - जळगाव येथील विश्रामगृहामध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या आयोजना नुसार शहर प्रमुख तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांची मिटींग घेण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचित पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार अमळनेर शिवसेनेतर्फे करण्यात आला.
सत्कारप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि अमळनेर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी सदैव ऋणी राहील. तालुक्याच्या व शहराच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे सांगितले. 
शिवसेना शहर प्रमुख व प्रभाग 15 चे कार्यक्षम नगरसेवक प्रताप शिंपी यांनी आभार मानले.त्यावेळी उपस्थित नगरसेवक शहर प्रमुख प्रताप शिंपी व तालुका प्रमुख विजय पाटील,उपशहर प्रमुख जिवन पवार,किरण पाटील चंद्रशेखर भावसार,देवेंद्र देशमुख, बाबु परब,मनिषा परब उपस्थित होते.