अमळनेर - येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आज सोमवार दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांचे बहारदार विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक अंंबादास मोरे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन ,संस्थेच्या अध्यक्षा अॅड. ललिता पाटील,सचिव प्रा. शाम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक देवेश्री पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी केले आहे.



