कु.भावना खैरनार विद्यापीठाच्या दोन सुवर्णपदकांची मानकरी

अमळनेर -
येथील प्रताप महाविद्यालयाच्या सन २०१८-१९ मधील संख्याशास्त्र विषयाच्या कु.भावना प्रविण खैरनार या विद्यार्थिनीस विद्यापीठाच्या  नुकत्याच झालेल्या पदवीप्रदान समारंभात दोन सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे.
             सन २०१८-१९ या वर्षाच्या परिक्षेत शास्त्र विभागात पदवी परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम व संख्याशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अनुक्रमे कै.इच्छाराम रामभाऊ सरोदे व स्व.प्रा. रघुनाथ केले यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक पदवीप्रदान समारंभाचे प्रमुख अतिथी श्री सुनिल देशमुख (अमेरिका),विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी.पाटील,प्र.कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्र. कुलसचिव प्रा.बी.व्ही.पाटील व परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्यासह विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य,अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते. कु.भावना खैरनार ही सामान्य कुटुंबातील असून तालुक्यातील नंदगाव हे त्यांचे मुळगाव आहे. तिचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहीणी आहे. पदवीप्रदान समारंभात सुवर्णपदक घेण्याच्या वेळी ते दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते. कु.भावना यावर्षी विद्यापीठात पदव्युत्तर वर्गाचे शिक्षण घेत आहे.तिच्या यशाबद्दल विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक,विद्यापीठातील     संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक वर्ग,खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल व सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ. ज्योती राणे व प्राध्यापक वर्ग आदींनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.