अमळनेर - पुणे येथील महा एनजीओ फेडरेशन, सोशल रिस्पॉन्सीबिलिटी व युवकमित्र परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार अमळनेर येथील योग प्रचारक कमलेश कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी दि.१२ जानेवारी रोजी पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सदर संस्थेच्या वतीने विवेकानंद
व जिजाऊ समाज रत्न व जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहेत. दि.१२ जानेवारीरोजी
दुपारी २.३० वाजता पत्रकार भवन,नवी पेठ,गांजवे चौक पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
योग प्रचारक कमलेश कुलकर्णी यांनी अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्हयात योग प्रचार,प्रसार व आरोग्य विषयक जागृतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. कमलेश कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



